व्हेजिटेबल मंचुरियन रेसिपी
साहित्य
• १ किसलेला कोबी • १ किसलेला गाजर • पाव कप हिरव्या पातीचा कांदा • पाव कप सिमला मिरची बारीक चिरलेली • पाव कप फरस बी बारीक चिरलेली • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली • १ छोटा चमचा आलं चिरलेलं • ३ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर • २ मोठे चमचे मैदा • १ मोठा चमचा सोयासॉस • २ छोटे चमचे रेड चिली सॉस • पाव छोटा चमचा काळीमिरी पावडर • २ मोठे चमचे टोमॅटो सॉस • २ छोटे चमचे आलं लसूण पेस्ट • २ छोटे चमचे व्हिनेगर • १ मोठा चमचा कांदा बारीक चिरलेला • थोडासा हिरवा कांदा पातीचा कांदा बारीक चिरलेला • व्हेजिटेबल बॉल्स तळण्यासाठी रिफाइंड तेल • मीठ चवीनुसार.
कृती
कोबीमध्ये सर्व भाज्या हिरवी मिरची, आलं, दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, दोन मोठे चमचे मैदा व थोडसं मीठ एकत्रित करा. यामध्ये एक छोटा चमचा सोयासॉस, काळी मिरी चूर्ण एकत्र करून छोटे छोटे बॉल्स बनवून डीप फ्राय करा. पुन्हा एका नॉनस्टिक कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून कांदा, आलं-लसूण पेस्ट परतवा. टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस व व्हिनेगर टाका. एक कप पाण्यामध्ये उरलेला मैदा व कॉर्नफ्लॉवर घोळवून मिश्रण टाका. उकळी आल्यावर व्हेजिटेबल बॉल्स टाका आणि मिश्रण कोरडं होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. हिरव्या पातीच्या कांद्याने सजवून सर्व्ह करा.