बेल फळ आरोग्यासाठी लाभदायक !
काही लोकांना बेल केवळ महादेवा अर्पित करण्यासाठी वापरले जाते एवढेच माहित आहे. त्यामुळे याच्या फळाचा फायदा खूप कमी लोकांना माहित आहे. बेलाचे फळ देवाला अर्पित तर केले जाते पण औषधी म्हणून सुद्धा वापरले जाते.
बेलाच्या फळामध्ये १०० ग्रॅम रसाळ भागात ६१.५% आर्द्रता, चरबी ३% प्रोटीन १.८%, फायबर २.९%, कार्बोहायड्रेट ३१.८%, कॅल्शिअम ८५ मिलीग्रॅम, शिवाय बेलामध्ये १३७ कॅलरी ऊर्जा आणि काही प्रमाणात व्हिटॅमीन बी सुद्धा आढळते.
Advertisement
- बेलामध्ये लेक्साटीव्हचा स्तर अधिक असतो. ते शरीरामध्ये रक्ताची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.
- शरीरात इन्सुलीन बनवण्यासाठी सर्वाधिक मदत करते. यामुळे मधूमेहाला आराम मिळतो.
- पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे.
- बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मूळापासून नष्ट होते.
- डिहायड्रेशन झाल्यास बेलाचे ताजे पाने वाटून मेंदीसारखे पायाच्या तळव्यावर लावावे. शिवाय माथ्यावर, छातीवरसुद्धा मालिश करावी.
- मिश्री टाकून बेलाच्या फळाचे सरबत प्यायल्यास त्वरीत आराम मिळतो.
- दररोज बेलाच्या फळाचे शरबत प्यायल्यास हिमोग्लोबीनची समस्या दूर होते.
- आयुर्वेदामध्ये बेलाच्या फळातून निघणाऱ्या तेलाने अस्थमा आणि श्वासाच्या आजारावर आराम मिळतो.
- बेलाच्या रसाला तुपात मिसळून दररोज प्यावे. बेलाच्या पानाचा वापर केल्यास हृदय शी निगडित आजार दूर होण्यास मदत होते.
- बेलामध्ये अँटीमायक्रोबिअल गुण आहेत. जे शरीराला संसर्गापासून वाचवते.
- बेलामध्ये फेनोलिक तत्वासोबतच अँटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे बेलाचे शरबत गॅस्ट्रिक अल्सर दूर करण्यास मदत होते. एवढेच नव्हे, तर याच्या सेवनाने एसिडीटी संतुलित राहण्यास मदत होते.
- बेलाच्या पानांमध्ये असलेल्या अर्कचे सेवन केल्याने. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
- आयुर्वेदात उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सेवन शरीरासांठी लाभदायक असते. बेलाच्या फळाचे फायदे फार कमी लोकांना माहित आहेत.
- बेलाच्या फळाचे शरबत तुम्हाला थंडाई आणि ताजेतवाण वाटण्यासाठी फादेशीर आहेच, मात्र आरोग्याच्या समस्यासुद्धा दूर करते. परंतु गर्भावस्थेत याचे सेवन करणे नुकसानदायक ठरु शकते.