बँक फिक्स्ड डिपॉझिट किती सुरक्षित आहे ?
आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवतो किंवा गुंतवतो त्यावर विमा संरक्षण असते असा सर्वसाधारणोपणे लोकांचा समज आहे. अर्थात हा समज चुकीचा नाही. पण बहुतेक लोकांना या विषयी पुर्ण कल्पना नाही. याचे नियम व अटी काय असतात, हे माहीत नाही असे मला आढळून आले आहे.
त्यामुळे आपण या विषयी थोडी अधीक माहिती घेऊया.
१) बँकेमधे ठेवलेल्या पैशांसाठी निक्षेप बिमा और प्रत्यय गॅरंटी निगम या सरकारी संस्थेतर्फे विमा संरक्षण दिले जाते.
२) भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील सर्व बँकांना हे विमा संरक्षण घेणे अपरिहार्य केले आहे.
३) हे विमा संरक्षण घेण्यासाठी जो प्रिमियमचा खर्च आहे तो प्रत्येक बँकेने स्वतःचा स्वतः करायचा असतो. हा खर्च ग्राहकांककडून वसूल करायचा नसतो. याचा अर्थ हे विमा संरक्षण ग्राहकांना मोफत किंवा विनामुल्य उपलब्ध असते.
४) बँकेमधे फिक्स्ड डिपॉझीट, रिकरींग डिपॉझीट, सेव्हिंग्ज बँक अकाऊंट व करंट अकाऊंट यामधे ठेवलेले पैसे व त्यावर मिळणारे व्याज यासाठी हे विमा संरक्षण उपलब्ध असते.
५) या विमा संरक्षणाची जास्तीत जास्त मर्यादा १ लाख रुपये (मुद्दल व व्याज मिळून) एवढी आहे. समजा एखाद्या व्यक्तीने बँकेत १ लाख रुपयाचे एफ. डी. केले व त्याला त्यावर १०००० रुपये व्याज मिळाले तर त्याला विमा संरक्षण फक्त मुद्दलाच्या १ लाख रुपयांवर मिळेल, व्याजाच्या १०००० रुपयांवर मिळणार नाही. पण जर त्या व्यक्तीने ९०००० रुपये ०० रुपये व्याज मिळाले एफ.डी. मध्ये टाकले व त्याला तर त्याला मुद्दल अधीक व्याज धरून ९९००० रुपयांसाठी विमा संरक्षण मिळेल.
६) समजा एखाद्या व्यकतीचे बँकेमधे एफ. डी., डी., सेव्हींग्ज बँक व करंट अकाऊंटमधे सगळे मिळून ५ लाख रुपये आहेत तर त्याला फक्त १ लाख रुपयांवरच विमा संरक्षण मिळेल, उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी विमा संरक्षण मिळणार नाही.
७ ) जर एखाद्या व्यक्तीने एकाच बँकेच्या निरनिराळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले व ही ठेव १ लाखांपेक्षा कमी आहे. असे त्याने ५ लाख रुपये ठेवले आहेत. तरी सुद्धा त्या सर्व पैशांना एकत्र करून त्याला फक्त १ लाख रुपयांपुरतेच विमा संरक्षण मिळेल. उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी विमा संरक्षण मिळणार नाही.
८) जर एखाद्या व्यक्तिने निरनिराळ्या बँकांमधे पैसे ठेवले व ही ठेव १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला प्रत्येक बँकेच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळेल. थोडक्यात जर एखाद्याला बँकत ठेवलेल्या ५ लाख रुपयांवर विमा संरक्षण हवे असेल तर त्याला प्रत्येकी १ लाख रुपये पाच निरनिराळ्या बँकांमधे गुंतवावे लागतील.