बहुगुणी जीरा आणि त्याचे फायदे !
जीरा केवळ जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर अनेक आजारांवरही लाभदायक असतो. डायबिटीक लोकांसाठी जीरा अत्यंत लाभकारी आहे. रक्तातील शुगरचे प्रमाण कमी करण्यात मदत करतो.
जीऱ्यात आयर्न भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तो रक्ताची कमतरता अर्थात एनीमिया दुरुस्त करतो आणि. रक्तात हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतो. हा शरीरात ऑक्सीजन सर्व अवयवांना पोचविण्यात मदत करतो.
दम्याच्या रूग्णाला याचा खूप फायदा होतो. यात थायमोक्यीनॉन नामक एक घटक असतो जो दमा रोखण्यास गुणकारी आहे.
आपल्या शरीरात विविध कारणांमुळे घाण जाते ती शरीर घाम आणि कांफ्सीच्या रूपाने बाहेर काढतो. जीऱ्याच्या नियमित वापराने शरीराची शोधन करण्याची प्रक्रिया गतिमान करतो आणि चेहऱ्यावरील मुरूम बाहेर येत नाही. तुमची त्वचा साफ आणि सुंदर राहते.
जीऱ्यामध्ये विटामिन ई भरपूर असते. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यात नैसर्गिक तेल असण्याबरोबरच एंटी फंगल गुणही असतो. त्यामुळे त्वचा इंफेक्शनपासून वाचते.
जीरा पाउडर तुम्ही आपल्या फेसपैकमध्येही मिसळू शकता. त्यामुळे यातील विटामिन ई त्वचेवर वयाचा दिसणारा परिणाम कमी करतो.
तुमच्या तळव्यात गर्मी जाणवत असेल तर जीरे पाण्यात उकळून थंड करून तहान लागल्यावर प्या. कोमट पाण्यात जीरा पाणी नेहमी पिता आले तर त्याचा फायदा दुप्पट वेगाने होतो. जीऱ्याच्या उपयोगाने बनलेला फेसपैक खूप फायदेशीर
असतो. तो हळदीसोबत मिक्स करून बनविला जातो. जीरा पावडर आणि हळद मधामध्ये वापरावे. हा पेस्ट चेहऱ्यावर लावून तो कोरडा होईपर्यंत ठेवावा. यामुळे त्वचा मऊ आणि उजळते.
जीरा केसातील कोंड्यावरही गुणकारी आहे. तेलामध्ये जिरे टाकून ते गरम करावे, नंतर ते डोक्याला लावल्यास कोंडा न नाहीसा होतो.