भरली भेंडी
साहित्य
२५० ग्रॅम ताजी भेंडी• २ मोठे चमचे कांद्याची पेस्ट • १ छोटा चमचा आलं व लसूण पेस्ट • २ मोठे चमचे भाजलेलं बेसन • लाल तिखट • २ छोटे चमचे धने पावडर • अर्धा छोटा चमचा हळद पावडर • १ छोटा चमचा आमचूर पावडर • दोन मोठे चमचे मोहरीचं तेल • मीठ चवीनुसार.
कृती
Advertisement
भेंडी स्वच्छ धुऊन व पुसून वरचा व खालचा भाग थोडासा कापून घ्या. प्रत्येक भेंडीला मधोमध उभी चिर द्या आणि हलक्या हाताने आतील सर्व बिया काढून टाका. एक मोठा चमचा तेल गरम करून कांदा, लसूण व आलं परतवून घ्या आणि नंतर सर्व कोरडे मसाले एकत्रित करून एक मिनिट परतवा. भाजलेलं बेसन त्यामध्ये एकत्र करा आणि मीठ टाका. मसाले थंड झाल्यावर प्रत्येक भेंडीमध्ये भरा. नॉनस्टिक तव्यावर तेल गरम करून भेंडी कोरडी आणि लाल होईपर्यंत शिजवा.