जवान चित्रपटाचा बॉलीवूड ला बुस्टर डोस

कोरोनानंतर चा काळ हा बॉलिवूड साठी तसा वाईटच गेला. गदर, पठाण आणि इतर तत्सम चित्रपटांनी चांगली कमाई केली; परंतु खऱ्या अर्थाने बॉलीवूडला आधार देण्याचे काम शाहरूख खानच्या ‘जवान’ ने केले आहे.

वय झाले म्हणजे सुपरस्टार संपत नाही, तर त्यांचा जिवंत अभिनय हाच सुपरस्टार असण्यामागील खरा निकष असतो, हे शाहरूखने दाखवून दिले आहे. त्याची पुरोगामी मते, आशीर्वाद घेण्यासाठी बालाजीला जाणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देणे यात कुठेही नाटकीपणा किंवा सवंगपणा नाही. त्याच्या ‘जवान’ ची झंझावाती कमाई बॉलिवूडसाठीही महत्त्वाचा आधार ठरली आहे.

कोरोनाच्या काळात टाळेबंदी लागू झाल्यापासून बॉलिवूडमध्ये कमाईचा सावरायचे हा मोठा प्रश्न होता. बॉक्स ऑफिसवर पुरेशी कमाई करण्यासाठी वाटत होते; परंतु २०२३ या वर्षाने हे सिद्ध केले की ‘ओटीटी’च्या जमान्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास शाहरूख खानच्या ‘पठाण’ने सुरुवात केली होती. पुढे सनी देओलच्या ‘गदर २’ ने बॉलिवूडच्या जिवंतपणामध्ये भर घातली. आता ‘जवान’ने सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी चांगली कमाई केली असून ‘पठाण’ लाही मागे टाकले आहे.

Advertisement

या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी ३५ कोटी रुपयांची दमदार कमाई केली असून याबाबतीत शाहरूखने स्वतःच्याच ‘पठाण’लाही मागे टाकले. ‘पठाण’ने दुसऱ्या रविवारी केवळ २८.५ कोटींची कमाई केली होती. ‘गदर २’ने दुसऱ्या रविवारी ३८.९ कोटींची कमाई केली होती. प्रदर्शनानंतरच्या ११ दिवसांमध्ये ‘जवान’ची कमाई देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील ५०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला असून तब्बल ४७५.७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने ११ दिवसांमध्ये जगभरात ८०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये ७९७.१० कोटींची कमाई केली होती. दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने केवळ केली आहे. चित्रपटाने दहा दिवसांमध्ये परदेशात २६७ कोटींची, भारतात ५३०.१० कोटी रुपयांचे कमाई कमाई केली.

हा चित्रपट लवकरच कमाईचा एक हजार कोटी रुपयांचा आकडा पार करेल. ‘पठाण’ आणि ‘गदर २’ हे ४०० कोटींचा टप्पा सर्वात जलद पार करणारे हिंदी चित्रपट आहेत. त्यांनी हा आकडा १२ दिवसांमध्ये गाठला. ‘बाहुबली २’च्या हिंदी आवृत्तीने १५ दिवसांमध्ये तर ‘केजीएफ २’ च्या हिंदी व्हर्जनने २३ दिवसांमध्ये हा आकडा पार केला होता. ‘जवान’ उत्तर अमेरिकेतही चांगली कमाई करत आहे. ‘जवान’ ने उत्तर अमेरिकन बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच नवव्या दिवशी १० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा पार केला. दहा दशलक्ष डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ८३ कोटी होतात. ‘पठाण’ने उत्तर अमेरिकेत दहा दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. त्याचे एकूण कलेक्शन १७.२५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४३ कोटी रुपये होते. म्हणजे शाहरूखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी अमेरिकेमध्ये शंभर कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा गाठला. असे करणारा शाहरूख हा एकमेव भारतीय अभिनेता आहे.

‘जवान’ ला मिळालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक ॲटलीला या चित्रपटाचा सिक्वल असावा, असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page