छोट्या आणि उपयुक्त गोष्टींचा प्रयोग करा आणि व्हा सुगरण !
• ढोकळयामध्ये फक्त कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे ढोकळा स्पंजदार तयार होतो.
• कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी, कारली खरवडून घ्या आणि मीठ व हळदीचे मिश्रण लावा. एक तासानंतर चांगल्या प्रकारे धुवा. कडवेपणा दूर होईल.
•कोथंबीर-पुदीण्याची चटणी बनवताना त्यात पाण्याऐवजी बर्फाचे तुकडे घाला आणि बारीक करा. चटणी कित्येक दिवस हिरवीगार राहील.
•फुललेले स्वादिष्ट पॉपकॉर्न बनवण्यासाठी ते तयार करण्यापूर्वी त्यांना थोडया काळासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. नंतर तयार करा, ते भरपूर फुलतील.
•बटाटा, कोबी इत्यादींचा आचारी परांठा बनवण्यासाठी आंबा किंवा मिरचीचे लोणचे ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. लाटण्याने परांठा लाटा. प्रथम लोणच्याची पेस्ट त्यावर घाला . मग सामग्री भरा. पराठा खूप चवदार बनेल.
•चहा बनवताना आले कमी असल्यास चहा बनल्यानंतर त्यात आले किसून घाला आणि उकळी आणा . चहामध्ये आल्याची संपूर्ण चव असेल.
•चहा किंवा एखाद्या गोड पदार्थात घालण्यासाठी तुम्हाला छोटी वेलची दळायची असल्यास ती फ्रिजमध्ये ठेवा. थंड वेलची ग्राइंडर मध्ये बारीक दळली जाते.
•भेंडीचा चिकटपणा काढून टाकण्यासाठी, स्टील च्या चाकूमध्ये लिंबाचा रस घ्यावा , नंतर त्या कापाव्या. अशाने भेंडीचा चिकट द्रव हाताला लागणार नाही.