स्पर्धात्मक यशासाठी पाळा हे नियम

काळासोबत चाला – कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी आपल्याला काळासोबत चालणे आवश्यक आहे.
स्वतःला प्रशिक्षित करा – जीवनात यशाचा मूलमंत्र आहे शिक्षण. स्वतःला प्रशिक्षित करा. स्वतःला जास्त शिक्षित करण्यासाठी खूप पुस्तके वाचा.
उद्देश्य निश्चित करा– सफलतेसाठी प्लानिंग महत्त्वाची आहे. जे कोणते करियर निवडाल त्याबाबत जास्तीची माहिती गोळा करा.
आत्मविश्वास – कोणत्याही परिस्थितीत आपला विश्वास ढळू देऊ नका. योग्य प्रयत्न आणि आत्मविश्वास प्रत्येक क्षेत्रात यशाची हमी आहे.
स्वतःला शिस्त लावा- एक सफल व्यक्ती वैयक्तिकपणे शिस्तीला खूप महत्त्व देतो. शिस्त यशाची महत्त्वाची पायरी आहे. यामुळे तुम्हाला चांगले वाटेल आणि इतरही शिकतील. –
संभाषण कला शिका – सफलतेसाठी बातचीत करण्यात निपुण असणे गरजेचे आहे. आपले म्हणणे प्रभावीपणे सादर करणारी व्यक्ती कमी पात्रता असतानाही यशस्वी होतो.
पीआर वाढवा – आपल्या ओळखीचा भरपूर फायदा घ्या. स्पर्धात्मक काळात संपर्क वाढविण्याला वेळ द्या.
योग्य मित्र निवडा – आपल्या यशामागे कोण ना कोणाचा हात असतो. त्यासाठी सच्च्या मित्राची गरज असते. जो प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करील आणि अडचणीत योग्य मार्ग दाखवील.
ड्रेस सेंस– योग्य वेशभूषा तुमचे व्यक्तित्व प्रभावित करते. तुमची वेश-भूषाच तुमचे पहिले इंप्रेशन असते.
करियर प्लान– करियर बनविण्याची ही पहिली पायरी आहे. यात चूक झाली तर मोठी किंमत मोजावी लागते. करियर प्लानिंग करताना उताविळपणा नुकसानदायक ठरू शकतो. संयमाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. त्यासाठी काही टिप्स अशा, करियर तुमची वैयक्तिक गोष्ट आहे, यात कोणाचा आवश्यकतेपेक्षा जास्त हस्तक्षेप होता कामा नये.
  •  करियर प्लानिंग तयार करताना धैर्य आणि संयम बाळगा.
  •  कोणतीही प्लानिंग करण्याआधी चांगल्याप्रकारे माहिती जाणून घ्या.
  •  एकदा सर्वबाजूंनी करियर निश्चिती झाल्यानंतर त्यात बदल करू नका.
  •  कोणाचा सल्ला एकदम दुर्लक्षू नका. त्याचे विषण करा. तो तुमच्या कामाचाही असू शकतो.
  •  असे करियर निवडा, जे तुमच्यासाठी सर्वप्रकारे फिट बसते.
  •  प्रैक्टिकल बना. चांगल्या करियर प्लानसाठी मदत होते.
  •  मोकळ्या मनाने विचार करा. जास्त अडचण येत असेल, तर करियर काउंसलरशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page