शर्मन जोशी सध्या काय करतो ?
रोहित शेट्टी, चित्रपट निर्मात्यांसोबत काम करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला शर्मन काळाच्या ओघात कधी गेला ते कळलेच नाही. आजची स्थिती अशी आहे की, वेब सीरिजमध्येही त्याला मुख्य भूमिका मिळत नाही. गुप्त बतमीदारांनुसार, जेव्हापासून त्याचे एका निर्माता दिग्दर्शकाबरोबर पैशांच्या बाबतीत खटकले, तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला आणि तो स्वतःहून उंचीवरून खाली फेकला गेला.
Advertisement
असो, आता तो श्रेया सरनसोबत ‘म्युझिक स्कूल ‘मध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांना तो आवडेल अशी आशा करूया.